STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

3  

आ. वि. कामिरे

Others

माणसाचे हे खुळ कसले ?

माणसाचे हे खुळ कसले ?

1 min
283

माणसाचे हे खुळ कसले ?

ना अधले ना मधले

आवड असे त्याची

म्हणून वेड असे त्यास जत्रेची

करुनी जत्रा साजरी

पसरवी अंद्धश्रद्धा अशी

लोका वाटे ती खरी

जणू ते निघाले काशी

खरच माणसाचे या खुळ कसले

कळत मला नाही

पोरगा जन्मला मांगलिक

म्हणू उपास तपासाला कमीही करीत नाही

खरच या माणसाचे खुळ काही समजत नाही

मांजर गेले आडवे

म्हणू तो रस्ता पारही करीत नाही

या माणसानेच बनवले सर्वकाही

तरीही त्याचा आरोप तो देवावर

थोपवायला कमीही करीत नाही

खरच या माणसाचे खुळ काय मला कळत नाही


Rate this content
Log in