STORYMIRROR

Rahul Shedge

Others

4  

Rahul Shedge

Others

"माणसा तु माणुस बन"

"माणसा तु माणुस बन"

1 min
132

  माणसा तु माणुस बन

     जगात नाही तुझे रे कोण ॥धृ॥


  देव नाही दगडात देव नाही मंदीरात 

   अंधश्रध्दा तु सोडुनी तुच दे रं

       श्रध्दा तु तुच ठेव

     माता-पित्याची सेवा कर

      तेचि असे परमेश्वर     ॥१॥


     दिवसा मागुन दिवस गेलं 

     आयुष्याचं क्षण हे थोडं 

 आई-वडीलांचे विसरू नको उपकार

   जगता-जगता चांगलं कर्म कर ॥२॥


    क्षण हे येणार क्षण हे जाणार 

   सुखःदुखाचा सारीपाट चालणार

    लाखमोलाचं घालवु नको क्षण 

    होत्याचं क्षणात नव्हतं होईल 

  मोकळा आला मोकळा तु जाणार ॥३॥


बालकाचा तु तरूण उदयाचा तु होशिल वृध्द

    तुझ्या हाती काही नाही राहणार

माणसा तु लक्षात ठेव

पुन्हा नाही तुला जन्म ॥४॥


  विश्व हे रे असे स्वर्ग येथेची रे असे नरक 

     सारे येथेची फेडावे लागेल 

     तुझ्या पापात कोणी नसेल 

     एकमेकांतील विसर तु वैर 

     आनंदानं जग प्रत्येक क्षण ॥५॥


       माणसा तु माणुस बन 

     जगात नाही तुझे रे कोण

रायफुल9763884988


Rate this content
Log in