STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

4  

SANJAY SALVI

Others

मामाचा नवा गावं …

मामाचा नवा गावं …

1 min
197

असा कसा बघा हो काळ बदलला,

नवं घेवून आला अन जून घेउन गेला,

आगीन गाडी गेली अन रेल गाडी आली,

मामाच्या गावाचा "कॉनसेप्ट"  झाला,

         माजघर परसू अंगण गेल,

         त्याजागी बंगलो नि कुंपण आल,

         आमराई गेल्या ठेकेदाराला,

         मामा मोठा व्यापारी झाला,

बैलगाडी संगे बैलजोडी गेली,

कोपऱ्यात उभी डिझेलची गाडी,

मामीला नाही जरासुद्धा वेळ,

पुरणपोळीचा सरला आता काळ,

         तुपलोणी गेल न चीज बटर आल,

         जास्तीच घेता मामीच डोळ मोठ झाल,

         गेले सूर पारंब्या न आट्या-पाट्यांचे  खेळ,

         वीडीओ गेमची वाजी छोटीशी बेल,

मामीची पोर हि लई हुशार,

येत जाता दावी श्रीमंतीचा जोर,

पळती झाडे पाहता सरला काळ,

मामाच्या गावाचा लागलाय "सेल",

         असा कसा बघा हो काळ बदलला,

         नवं घेवून आला अन जून घेउन गेला,

         जुन गेल नवं आल त्याचा नाही सलं,

         आजा-आजी आठवता डोळ पाणावल !!!,


साहित्याला गुण द्या
लॉग इन