Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गीता केदारे

Children Stories

4.9  

गीता केदारे

Children Stories

... मामाचा गाव...

... मामाचा गाव...

1 min
1.3K


... मामाचा गाव... 


लागली सुट्टी शाळेला

जाईन मी आता गावाला

आजी बघतेय वाट माझी

मामा येईल घरी न्यायला...


झूक झूक गाडीत बसून

पोहोचलो मी गावाला

गावची हिरवळ पाहून

प्रसन्नता आली मनाला...


गेलो मित्रांबरोबर नदीवर

मजा आली पोहायला 

थंडगार पाण्यात भिजून 

शमवले उन्हाच्या काहिलीला... 


उडवूनी एकमेकांच्या अंगावर पाणी 

घेतला मनसोक्त आनंद 

चेहऱ्यावरील हर्षाने आमच्या 

गाठला परमोच्च स्वानंद.... 


सुख हे सिमित गावापुरते 

शहरात नाहीत नदीनाले 

म्हणूनच आवडते गड्या मला 

यायला मामाच्या गावाले... 


... © सौ. गीता विश्वास केदारे... 

         मुंबई 






Rate this content
Log in