माझ्या वर्गातील ती
माझ्या वर्गातील ती
1 min
342
शाळेचे रम्य दिवस
ही पुन्हा यायचे..
आठवणीचे क्षण मात्र
हळुवार जपायचे..!!
रोज तिच्या बाकाकडे
नजर लावून बसायचे..
माझ्या मनाच्या प्रश्नात
मीच पुन्हा फसायचे..!!
येता समोर ती
कच मनाने खायचे..
जाता निघून ती
मागे वाळून पहायचे..!!
सुटता शाळा मग
नकळत सोबत जायचे..
येता घर समीप तिचे
मार्ग माझे बदलायचे..!!
आज नक्की विचारेन
पक्के मनाशी ठरवायचे..
पण साला मांडे खाण्यातच
दिवस निघून जायचे..!!
