माझ्या पदरात
माझ्या पदरात
1 min
318
जन्म घेतला तू माझ्या पदरात
आईची माया ठेव पोरी आदरात....
तुझ्या सावलीत माझ घर खेळत
पोरी तुच माझा जीव हे कळत
तुझ्यासाठी प्रेम दाटत माझ्या उरात....
आईच प्रेम तुझ्यावर अपार
सुखात नांदते पोरी माझी दुपार
तुझ्यासाठी गाते अंगाई दिन रात....
अंगणी पडती तुझ्या पाऊला ठसे
तुझे बोल ऐकून माझे सुख हसे
माझ्या दारातून जाईल तूझी वरात....
पोरी माझ्या जीवनाच सोन तू
आईच्या जगण्याच आहेस नाण तू
हेच मागण तूझी सुखाने भरो परात....
