STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

माझ्या मनातली भिती...

माझ्या मनातली भिती...

1 min
470

खुप दिवस झाले

रोज विचार करतो तुला सांगायचा

पण बोलण्याची हिम्मतच होत नाही

अस नसतच की मी प्रयत्न करत नाही

पण सगळे प्रयत्न नुसतेच व्यर्थ

तू समोर आलीस की

सगळच अनर्थ

कारण मनात आहे एक भिती

तुला गमवायची

तुला कदाचित ऐकुन गंमत वाटेल

हसू पण येइल..

पण मला तुझ्या हसण्याची फिकिर नाही

कारण ही भिती तुला नाही कळणार

ह्या दुरव्याचे दुख तुला नाही समजणार

मी प्रेम केल तुझ्यावर

पण नेहमी ही भिती आड आली

माझ्या फ़सलेल्या प्रत्येक प्रयत्नात

आठवण तुझी साठवून गेली

तुझ्या गोड हसण्याला मला दाद द्यायची होती

पण ही भिती एकच सांगत होती

तुला माझ बोलन नाही आवडल

तर तुझ हे हसू बन्द होइल

आणी मला पाहुन फक्त तुझे कटाक्ष येतिल

रागाचे अन् द्वेषाचे

म्हणुन मिच थांबवतो स्वताला

लपवत माझ्या प्रेमाला...


तुझ्या कळत नकळत

तुझ्या काळ्याभोर केसांना

कुरवाळत असतो मी

पण हे सार स्वप्नात

कारण वास्तवात एक भिती आहे

तुला माझ्या डोळ्यातल तुझ सौंदर्य नाही आवडल तर

तुलाही ते खोट वाटल तर

म्हणुन मीच थांबवतो स्वताला

लपवत माझ्या प्रेमाला....


पण तुझी प्रत्येक आठवण साठवून ठेवली आहे मी मनात

कारण एक दिवस तुला हे गूज नक्की सांगणार आहे मी

मनातली ही भिती जिंकून

तुला माझी स्वप्नसुंदरी बनवणार आहे मी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन