माझं कोंकण...
माझं कोंकण...
1 min
1.2K
दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाट
मला आस लावते माझ्या कोकणी भाषेची
फणसासारखे मधुर अपुल्या माणसाचे मन
दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती
कोकणात माझ्या विस्तीर्ण सागर
मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर
लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके
कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके
करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा
निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा