STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

माझं गाव

माझं गाव

1 min
241

गिरणेच्या काठी वसलेलं

नावातच दिसावी श्रीमंती

'चाळीसगाव' हे त्याचं नाव

जन्मले शिकले ह्याच गावी

खूप प्रिय मला माझं गाव


वाल्मिक ऋषींची वालझेरी

भास्कराचार्य पाटणगावी

जनार्दन स्वामींचे जन्मस्थान

जागतिक किर्तीच्या केकींची

आर्टगॅलरी, निवासस्थान


अध्यात्मिक, कला, विज्ञानात

चमकले येथलेच हिरे

अंतराळ संशोधक मुली

हिंदू मुस्लिम ऐक्याची क्षेत्रे

बामोशी, दर्गा सर्वांना खुली


मा. राष्ट्रपती प्रतिभाताई 

बालपणी येथेच शिकल्या

सांगू काय? किती ते महान!

प्रत्यक्ष भेट द्या!

ताकावर दुधाची भागते का तहान?


साहित्याला गुण द्या
लॉग इन