माझी प्रेरणा
माझी प्रेरणा
1 min
253
तूच माझा जीव की प्राण
माझी प्रेरणा तूच माझं लिखाण
राणी मी तुला पसंद केले
काल मी आईला सांगितले....
मनाला भावला तुझा रुबाब
देतो तुला मी प्रेमाचा गुलाब
तू आहेस परीहून प्यारी मी तुझ्या
सावळ्या रूपावर प्रेम केले......
कुठेही लागेना मन माझं
पाहतो जिकडे दिसतं रूप तुझं
तुझ्या तिरक्या हसण्यात
माझे क्षण हरवून गेले....
मनातली गोष्ट मला सांगू दे
तुझ्या रंगात मला रंगू दे
तुझं बदकासारखं चालणं
पाहून माझं मन डोले.....
माझ्या पापण्यांवर तुला बसवलं
दुःखात होता संगम तू हसवलं
साथ दे तू माझा तुला मी
जन्माचे वचन दिले.....
