माझी मातृ माय मराठी
माझी मातृ माय मराठी
माझी मातृभुमी असे मराठी
माझी मातृभाषा असे मराठी ॥धृ॥
शब्द असे तेचि हो मोती
सर्वांना लळा ती लाविती
सार्यांना हो ती ओढ लाविती
माझ्या मराठीची खुप हो महती ॥१॥
रत्नांनी ही सजलेली
विचारवंतानी वर्णिलेली
हदयस्पर्शी जणु मखमली
विश्वात असे गैारवशाली ॥२॥
संस्कारशील महान ती संस्कृती
मायाळुपणे जवळ करी
तिच्यामध्ये असे रसाळ गोडी
सार्यांना वाटे हो आपुलकी ॥३॥
माझ्या मायभुमीत
जण हो भान हरपती
जगी खुप तिची किर्ती
माझी माय असे मराठी ॥४॥
तलवार तळपती या भुमिची
हिमालयाच्या साथी सह्याद्री धावी
गाता असे ज्ञानेश्वरीची
माझी ही माय देई हो स्फृर्ती ॥५॥
श्रृगांराने सजलेली
विविध अंगाने नटलेली
राजभाषेची थोरवी असे मनोमनी
सार्या विश्वाला प्रिय मराठी ॥६॥
