माझी आई माझा आदर्श
माझी आई माझा आदर्श
1 min
1.1K
माझी आई माझा आदर्श
तिनेच दिली मज प्रेरणा
संस्काराचे धडे देवूनी
तीच करी विचारणा......!!
आईने शिकविले बालपणी
घेऊन माझा हात हाती
माझ्यासाठीच तीनेही
जागल्या कित्येक राती....!!
नैतीक मूल्यांची जपणूक
शिकवला आम्हां मानपान
सर्वाचा आदर करावा आपण
असोत मोठे वा असो सान...!!
कष्टाचीच खावी भाकरी
दिली आईने शिकवण
संयमाने रहावे संकटी
एकाग्रपणे ठेवावे मन.....!!
माझी आई माझा आदर्श
किती गावू तुझी गाथा
तुच माझा गुरु आई
तवचरणी टेकविते माथा....!!
