माझे तुझ्यावर प्रेम आहे.
माझे तुझ्यावर प्रेम आहे.
माझे तुझ्यावर प्रेम आहे
बोलणे खूप सोपे असते
भावनांच्या आहारी जाऊन
ते सतत मनाशी संघर्ष करते
आयुष्यात शब्दाचे वचन पाळणारे
खूप कमी दिसतात
शब्दाना निभवणारे क्वचितच असतात
प्रेमी युगल प्रेमाच्या खोट्या थोतांडापाई
विरहात झुरताना आढळतात
उरलेले आनंदी आयुष्य दुःखात झोकून देतात
माझे तुझ्यावर प्रेम आहे
हे एक शब्दाचे तप आहे
कष्टाच्या घामातुन सतत
ते उजाळत आहे
यात प्रत्येक यशस्वी होत नाही
प्रेम लगेच कुणावरही होत नाही
ते कर्तुत्वाने सिद्ध करायचे आहे
प्रेम भंगानंतर विरहाचे दुर्लक्ष
पचवायला शिकले पाहिजे आहे
लगेच विसरुन दुर्लक्ष करायचे आहे
माझे तुझ्यावर प्रेम आहे
हे सत्यात उतरावे लागते
सत्याचे रूपांतर नेहमी
कृतीत दिसायला असते
विश्वासाच्या पातळीवर उंच शिखर
सर करायचे असते
आयुष्यभर साथ देऊन
माझे तुझ्यावर प्रेम आहे
हे नेहमी संसारात बोलायचे असते
