STORYMIRROR

Rahul Shedge

Others

3  

Rahul Shedge

Others

"माझे ही हे विश्व आहे"

"माझे ही हे विश्व आहे"

1 min
150

माझा कसुर काय तुम्ही सांगा ना 

विश्वात मी यायचे नाही का ॥धृ॥


गर्भातली कळी मी

 इवलीशी बाहुली  

मला ही हे जग 

बघायचे आहे ना ॥१॥


दिव्याच्या जोडीला 

वात हवी ना 

वातेशिवाय दिवा 

पेटेल काय ॥२॥


तुमचेच अंकुर मी

मला खोडु नका  

गळत्या पानाला मी

 आधार देईन ना ॥३॥  


मला नको चिऊ 

मला नको खाऊ 

आपण सारे 

मिळुनी राहुया ना ॥४॥  


विश्वात नाव मी

 रोशन करेन ना

आपले घरदार    

 सारे उजळेल ना ॥५॥  


 माझे अस्तित्त्व 

 मिटवु नका ना

तुमच्या-माझ्यासारखे 

 जन्माला येतील का ॥६॥  


Rate this content
Log in