STORYMIRROR

Akash Mahalpure

Others

4  

Akash Mahalpure

Others

माझे बालपण..

माझे बालपण..

1 min
302

रम्य सुंदर होते माझे बालपण

काळ होता तो सुखाचा

निरागस चंचल बालमण

स्वछंदी आनंद जगण्याचा||१||


पाण्यात होते स्वतःचे जहाज

चिखलातही किल्ले होते 

कागदाचे तर विमान होते 

सर्वच राज्य स्वतःचे होते 

खूप श्रीमंत माझे बालपण होते||२|| 


सर्वाना बालपण लाभले

मोहक लळा लावण्याचे

हट्ट धरुन लाङाने रूसण्याचे

खेळत दंगामस्ती करण्याचे||३||


निस्वार्थ निरागस ते मन 

आनंद होता जगण्याचा

पाहिजे ते मिळवण्याच्या 

फुलपांखरासम उङण्याचा||४||


बालपण माझे खरच छान होते 

आईचा पदर सारे विश्व होते

बालमनाला मोकळे रान होते 

चिमुकल्या निरागस जीवाला 

आभाळ माञ खूप लहान होेते||५||


आयुष्य केव्हा कसे जगलो

हे माञ कधीच कळले नाही 

हरवून गेलेले माझे बालपण आता

हे परत कधीच येणार नाही||६||



Rate this content
Log in