STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

माझे आईबाबा

माझे आईबाबा

1 min
386


माझे आईबाबा | गेले देवाघरी |

वेदनाही उरी | सलतेच ।।


हरवली माया । झाले मी पोरकी ।

वाटते एकाकी । नेहमीच ।।


आठवण येता । कळीज भरते ।

डोळेही भरते । आपोआप ।।


आईची हो माया l उसनी भेटेना ।

चैन ग पडेना । मनाचिया ।।


बापाचे रे छत्र । मोठे जगाहूनी ।

जीवनात कमी । वाटे सदा ।।


कुठे शोधू तुम्हां । हरवली माया ।

सुखाची ग छाया । सापडेना ।।


काहूर दाटले । वाईट वाटते।

एकटी रडते । कधी कधी ।।


अनाथ मी झाले । नशीब फाटके।

दुःखाचे चटके । जीतेपणी।।


कसं भांडू देवा । दगडाची मूर्ती ।

तळमळे किती । जीव माझा ।।


नाही तुला कीव । घेतलास जीव।

दुःखाची जाणिव । रात्रंदिन ।।


आई-बाबा पुढे । सर्व नाती फिकी।

नात्यात रे एकी । दिसते का ।।


कोणीही कुणाचे । नसतात खरे ।

कोरडे फवारे । ओतणारे....।।


Rate this content
Log in