STORYMIRROR

Akash Mahalpure

Others

4  

Akash Mahalpure

Others

माझा वृक्षसखा..!

माझा वृक्षसखा..!

1 min
345

वृक्षसखा देतो

मला आॉक्सीजन निरंतर..

एका गावाच्या, राज्याचा, देशाचा इतिहास बनून ज्याच्या सावलीतील अंगाखाद्यावर


खेळलो बागडलो

मनसोक्त विसावलो

जीवनाच तत्वज्ञान शोधलं

ज्याच आदिम सावली

भिनली रक्तात कायमची..

ज्यानं माझ्या असंख्य

पिढ्यांना लढण्याचं बळ दिलं...


वृक्षसखा तुझ्या कत्तलीतील

नव्या पालवीसारखं..

मीही शिकलोय आता

ताठ मानेनं उभे रहायला..

वृक्षसखा तू देहात,रक्तात

भिनला कायमचा..


तुझ्या पानातील हिरवी हिरवी गोड भाषा.. 

गावाला हिरवेपण देऊन गेली..

वृक्षसखा तू तोडलं स्वत:च शरीर..

आणि झिजत राहिला आयुष्यभर..

गाव, वाड्या, वस्त्या,

तांड्यासाठी..

युगानुयुगाचा फुललेला बहर

घेतलायं कायमचा अंतरंगात शिरून..


वृक्षसखा तू ज्ञानोबांचा अभंग गात राहिला..

एवढं जगदव्याळ

तत्वज्ञान वृक्षसखा तुझ्यात‌

तू बहरू लागला माणसांसाठी

तुझ्या निरंतर फुलण्यावर

उभं राहिल हिरवगर्द  

माणसाचं बेट.‌.!


Rate this content
Log in