STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

4  

Anupama TawarRokade

Others

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
208

काळ्या कसदार मातीची

लेकरे निधड्या छातीची

अनेक धर्म, जातींची

ओळख आहे महाराष्ट्राची


अहिराणी,मालवणी,वरहाडी

अस्सल पुणेरी मराठी

प्रत्येक भाषा येथे गाते गाथा

उजळत राहो महाराष्ट्राचा माथा    


माणुसकीची बोलतो भाषा

मराठीला मान मातृभाषा

विविधतेने नटलेल्या देशा

जय जय महाराष्ट्र देशा


इतिहास इथला लढवय्या 

शुर विरांनी गाजविला

संत, महात्मांनी रचीला

समाजसुधारकांनी घडविला


आर्थिक राजधानी देशाची

साहित्य, क्रीडा, कलाकारांची

व्यापार अन् उद्योजकांची

आहे शान महाराष्ट्राची


साहित्याला गुण द्या
लॉग इन