STORYMIRROR

asmita khake

Inspirational Others

3  

asmita khake

Inspirational Others

माझा भाऊराया

माझा भाऊराया

1 min
344

आहेस तू माझ्यासाठी

कधी दादा कधी ताई

ओरडताना बाबा अन्

सावरताना आई


आधाराला नेहमी वाटे

तुझ्याविना नाही कोणी

ठेच लागता मला येई

तुझ्या डोळ्यात पाणी


माहेरच्या परसात

उभा पळस तू मोठा

पाठीराखा तू आमचा

भाऊराया तू मोठा


धाडीता निरोप कधी

तू येई वाऱ्यावरी

मायेची सावली तुझी

मोठी माझ्यावरी


मागते मागणी आज

चरणी गणराया

दरवर्षी राखी बांधाया

येवो माझा भाऊराया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational