STORYMIRROR

asmita khake

Others

3.2  

asmita khake

Others

नाव

नाव

1 min
260


एक नाव इथे अजुनही तरंगतेय

का? सापडला नाही तिला तिचा किनारा !


किनाऱ्यावर तुझे नाव कितीदा गिरवले

समुद्राने लाटांचे हात त्यावर फिरवले !


बाकी सगळे घेऊन तुझ्यासवे आले

तरी नाव माझे आणायचे राहूनच गेले !


गाठ बांधली तिथे साता जन्माची

इथे नाव नात्यास खरे कोणते द्यावे ?


ही दुनिया म्हणे आहे रंगमंच वेगळा

इथे ठेवली नावे माझी वेगळी वेगळी !


जुळवूनी अक्षरे रचल्या चार ओळी

कवितेस नाव शेवटी द्यायचे राहिले !


Rate this content
Log in