एका वळणावर...
एका वळणावर...
1 min
226
भेटलास तू
एका अनपेक्षित वळणावर...
सप्तरंग उमटले
खोल कुठे काळजावर...
शब्द कसे जुुळुनी आले
अबोल या ओठांवर...
वेगळाच रंग आला कसा
वेलीवरल्या या फुलावर...
ओंजळीतली सारी दुःख
उडून गेली वाऱ्यावर...
कशी उमटली नवी रेघ
माझीया या हातावर...
नाहीच केले प्रेम इतके
हिने कधी स्वतःवर...
मग का जिव जडला
तुझा या वेडीवर..?
भेटीच्या या वळणापासून
शेवटच्या ही वळणावर...
असेच जपावेस तू
हे पिंपळपान सुकल्यावर...
