अशी सांज येते
अशी सांज येते
1 min
150
मावळतीच्या वाटेवरी अशी सांज येते
आठवांची आसवे ढळतात कुठूनी
सोबतीला माझ्या एकांत असताना
तुझी आर्त हाक येते दुरूनी
आतुरलेली वाट वळणाची
तुझी पावले शोधत राहते
सावळ्याश्या सांजेत, मग
सावली माझी मला दुरावते
अंगणी कधी अशी सांज येते
सोनपिवळ्या किरणांनी मोहरलेली
पारिजातकापरी रिता होता
आठवांनी ओंजळ माझी भरलेली
सख्या जेव्हा अशी सांज येते
अबोल थोडी, थोडी कुंद
सारे जग स्तब्ध होते
तू सांजवता मंद मंद
