एक आठवण...
एक आठवण...
1 min
291
एक आठवण ...
तुझ्या सोबतच्या संध्याकाळची
तुझ्या बोलक्या नजरेची
भुरभुरणाऱ्या तुझ्या केसांची
लाजऱ्या गालावरच्या लालेची
एक आठवण...
तुझ्या पहिल्या स्पर्शाची
बेधुंद करणाऱ्या श्वासाची
मिठीतल्या तुझ्या उबेची
नकळत वाढलेल्या ठोक्याची
एक आठवण...
शहारलेल्या अंगाची
थरथरलेल्या त्या ओठांची
तुझ्या वेड्या प्रेमाची
लवकर झालेल्या सांजेची
