STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

4  

प्रतिभा बोबे

Others

माझा बाप शेतकरी

माझा बाप शेतकरी

1 min
321

माझा बाप शेतकरी

काय सांगू त्याची कथा

करे कष्ट दिनरात परी

ना कळे कुणा त्याची व्यथा ।।


उन्हातान्हात राबतो

घाम गाळतो पोटासाठी

मिळो कितीही उत्पन्न

जाई क्षणात कर्जापोटी।।


भाव मिळेना शेतीमालाला

आवळे पाश सावकारी

काळजी आमची लागे त्याला

विचार करत बसे दारी।।


निसर्गही देईना आता

साथ शेतकरी बापाची

कापणीला येता पीक

होते अवकृपा निसर्गाची।।


होई वातावरण ढगाळ

कीड पडे पिकांवर

पाऊस येवो न येवो

काळजी सदा त्याच्या मुखावर।।


शेतकरी माझा बाप

साऱ्या जगाचा पोशिंदा

समद्यांनी द्या हो मान त्याला

नको त्याच्या गळा आता फाशीचा हो फंदा।।


Rate this content
Log in