STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

माहेर

माहेर

1 min
156

माझे माहेर सुंदर

जणू मायेचा सागर 

भेटते उसंत मला 

जशी मायेची चादर ||१|| 


गेले बालपण माझे

आता आठवणी उरे

होती स्मरण गावाचे

वाहती अश्रूंचे झरे ||२|| 


माय माझी साधीभोळी 

लावी माया जीवापरी 

लळा असे बाबांचाच 

आम्हा सार्‍या लेकींवरी ||३|| 


ओढ असे माहेराची 

तसा शीळ घाली वारा

माळरानी गाणे गातो

पहा चैतन्याचा झरा ||४|| 


आठवणींची शिदोरी

असे अमूल्य दागिना

मोल अशा माहेराचे

कशाला पण येईना ||५|| 


Rate this content
Log in