माहेर माझे
माहेर माझे
1 min
293
माहेरला आज सखी
जाते वेगाने विजेच्या
आहे कसा फुलपंखी
गांधणारा फुलांचा बगीचा
किती ओढ मला लागे
मोर जसे नाचे रानी
तुला ठावे चंद्रभागे
माहेरची माझ्या गाणी
दारी उभा आहे बाबा
अंगणात हसे आई
खेळू मैत्रिणी गरबा
आई गाईल अंगाई
सारे विचारी मजला
कशी आहे मुलगी गं
चांदण्यात देह भिजला
आहे नवरा चांद गं
