Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Babu Disouza

Others


3  

Babu Disouza

Others


मागणी

मागणी

1 min 158 1 min 158

लुटले जाणार कळूनही लुटू दिले त्यांना

मायेचा पसारा भोवताली समजू दे त्यांना

उदासीनतेचे काळवंडून आले आभाळ

मळभाने आणलीअवकळाअंतरी त्यांना

-१-

पाऊस धारा, वारा गारा, वादळ पाचवीला

कधी अवर्षण कधी अतिवर्षा पूर बला

श्रमाने पिकविली शेती नेला घास तोंडचा

पाडले भाव दलालाने मनभावी मनाचा

-२-

हटवादीने बळी देती नेते बळीराजाचा

बहुमत दिले केला तो गैरवापर त्याचा

आसमानी सुलतानी कुठे करावी फिर्याद

जवळ केला फास ना उपयोग नक्राश्रूंचा

-४-

आततायी वर्तनाने क्षणात ध्वस्त संसार

विस्कटले चित्र सुखाचे परिस्थिती नादार

नको कर्ज माफी करील भविष्याला बेजार

वीज पाणी मिळावे विना खंड तर बाजार

-५-


Rate this content
Log in