लयास गेले कधीच ते
लयास गेले कधीच ते
1 min
192
लयास गेले कधीच ते
रामराज्य या भूमीवरचे
आता इथल्या रामातही
काही उरला नाही राम..
रावण पैदा झाले इथे
सीताही जिकडे तिकडे
वानरसेना बहुत जाहली
म्हणती न कुणी राम राम..
संकटात जरी असते सीता
मदतीला कुणी धावत नाही
आता इथल्या सीतेलाही
शोधत नाही कुठला राम..
महिमा कलीयुगाचा ऐसा
मिळून राहती रावण राम
सीता रडते धाय मोकलून
झाले सगळे नमक हराम..
