STORYMIRROR

Shakil Jafari

Others

4  

Shakil Jafari

Others

लेखणी

लेखणी

1 min
224

हे प्रेषिता !

तुम्हीच म्हणाला होतात,

एका हदीसा मध्ये,

साहित्याकाच्या हातातल्या,

लेखणीची शाई,

शहीदांच्या रक्तापेक्षाही,

पवित्र असते म्हणून !

हे प्रेषिता !

निसर्गाला झोपेतून उठवणाऱ्या सूर्यासारखा

तेज असेल तरच न,

लेखणीची किंमत ?

हे प्रेषिता !

गुलाब पुष्पांची कोमलता,

मोगऱ्यांचा सुगंध,

दव बिंदूंसारखी शीतलता,

आणि

विस्तावा सारखे सत्य

असेल तरच न,

लेखणीची किंमत ?

हे प्रेषिता !

विनय देणारे विज्ञान,

अनुभव देणारे अध्ययन,

प्रकाश देणारे संदर्भ,

आणि

अंधकाराला पळवायला लावणारा संकल्प

असेल तरच न,

लेखणीची किंमत ?

हे प्रेषिता !

अंधळ्यांना दृष्टी देणारी,

लंगड्या, पांगाळ्यांना पाय देणारी,

मूके लोकांना भाषा देणारी,

आणि

मृत जीवांना जीवन देणारे

अमृत असेल तरच न,

लेखणीची किंमत ?

हे प्रेषिता !

आज लेखणी गुलाम बनली आहे,

पत्कारली आहे,

जमींदार, जहागीरदार

आणि

बुर्जुआ सरकारची गुलामगिरी !

अत्याचार व अन्यायाला बळी पडून,

गर्भ दारिद्र्याचे जीवन जगणाऱ्या,

गरीब लोकांची मनो वेदना

आजच्या बहिऱ्या लेखणी ऐकतच नाही,

जर ऐकले तरीही,

करेंसी नोट तोंडात कोंबून

मूक होऊन बसते !

पहाट होऊन,

क्रांती होऊन,

लेखणीतून अवतरीत होणारे अक्षर,

आता निर्जीव झाले आहेत !

हे प्रेषिता !

खड्गासम दामिनी होऊन,

चमकणारे अक्षर,

आता तेजहीन होऊन गेले !

मूठ आवळून हृदयाला पेटवणारे,

विस्तवा सारखे अक्षर,

आता विझून गेले आहेत !

हे प्रेषिता !

हरवून टाकली लेखणी, स्वतःच्या पावित्रतेला !

हे प्रेषिता !

हरवून टाकली लेखणी,

स्वतःच्या पावित्रतेला !!

हे प्रेषिता !! हे प्रेषिता!!!


Rate this content
Log in