लेखणी
लेखणी
1 min
167
नको नको म्हणता जन्म घेतला जगा
आई म्हणे राजकुमारी पहा तरी जरा
घरात पसरे शोककळा कन्या आली घरा
दुर्गा लक्ष्मीपूजन मानता मलाच ना करता
पहिली मुलगी घरात लक्ष्मी असे फक्त म्हणता
जन्माआधी मला मारून का हो टाकता
बेंबीच्या देठातून सांगे नको करू भ्रूणहत्या
मुलगा मुलगी एक समान लक्षात राहू द्या
मुलगी असते धनाची पेटी तुम्हीच म्हणता ना
प्रेमाची भुकेली मी हृदयात मज ठेवा ना
कुंचल्यातून साकारले चित्र खरे ठरेल ना
अस्त्र माझी लेखणी, समाज बदलेल ना?
