.... लावण्यवती.....
.... लावण्यवती.....
1 min
424
बहरलेल्या रात्रीला
चंद्राची साथ
मलमली स्पर्श तुझा
तुझ्या हाती माझा हात...
पौर्णिमेच्या चंद्राहूनी
रुप तुझे देखणे साजनी
हरवून जातो स्वतःला
रुप डोळ्यात साठवूनी
नयन हे बोलके
कटाक्ष मारती तीर
घेई लक्ष वेधूनी
नजरेची ही भिरभिर...
भाळावरची चंद्रकोर
चंद्राला ही लाजवी
टिपूर चांदणं चेहर्यावर
लाजणं तुझं लाघवी....
अंग मोहरलेलं तुझं
त्याला मोगऱ्याचा गंध
कमनीय बांधा तुझा
कटिकेवर साडी तंग....
किती करावं वर्णन
तुझ्या रुपाचं साजनी
कोरलंय प्रतिबिंब तुझं
या माझ्या मन दर्पनी....
