लावणी - मी पुढारलेली बाई
लावणी - मी पुढारलेली बाई
1 min
466
लेखू नका मज कमी
आहे माझीही कहाणी
युगायुगापासूनी मी पुढारलेली बाई
नका हो समजू तुम्ही मला अबला बाई...।।धृ।।
मी जरी कोमलांगिनी
तरी खंबीर मी मनी
नका स्त्रीजात म्हणुनी
अभिमानी हिरकनी..
स्त्रीत्वाच स्व:रक्षण करण्या होते वाघीनी
नका हो समजू तुम्ही मला अबला बाई...।।१।।
माता जिजाऊचा मान
सावित्रीमुळे ही शान
नारी शक्तीची झलक
अस्तीत्व दाखवी चमक...
ओलांडलाय मी उंबरठा घेऊनी हक्क
नका हो समजू तुम्ही मला अबला बाई ...।।२।।
