STORYMIRROR

siddheshwar patankar

Others

4  

siddheshwar patankar

Others

लाल करा ओ माझी लाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

1 min
406

लाल करा ओ, माझी लाल करा


येता जाता लाल करा


पुसा मला तुम्ही येता जाता


पुसूनि पुरते हाल करा,


लाल करा ओ लाल करा


येता जाता लाल करा


भजा मज तुम्ही भाई दादा


तुमचाच राहीन, पक्का वादा


गोड बोलुनी बेहाल करा


लाल करा ओ माझी लाल करा


येता जाता लाल करा



समजू नका मज ऐरागैरा


नीट बघून घ्या माझा चेहरा


या गोंडस, लोभस मित्रासाठी


प्रेमाची पखाल करा


लाल करा ओ माझी लाल करा


येता जाता लाल करा



नका कटू कधी बोलत जाऊ


बनेन मग मी शंभू न शाहू


छाताड पुढे, फुगतील बाहू


कशाला स्वतःला हलाल करा


लाल करा थोडी लाल करा ओ


येता जाता लाल करा



क्रोध द्वेष जरा लांब राहू दे


प्रतिसादाने न्हाऊन जाऊ दे


पाठीवरती कशाला उगाचच


या छातीवरती वार करा


लाल करा ओ माझी लाल करा


येता जाता लाल करा



कल्पनेत मी रमतो गातो


एकलाच मी प्रेम वाटतो


बिनडोक्याच्या या वाघासाठी


मायेची तुम्ही शाल धरा


चुटकीसरशी काम करा


लाल करा माझी लाल करा


येता जाता लाल करा


साहित्याला गुण द्या
लॉग इन