STORYMIRROR

Punaji Kotrange

Children Stories

3  

Punaji Kotrange

Children Stories

लागली तुझी चाहूल मला

लागली तुझी चाहूल मला

1 min
198

लागली तुझी चाहूल मला

सदा हवा हवासा वाटतो

नाही भेटला कधी मला तू तर

तुला बाटली मधून घेतो


फळांचा राजा रे तू

सगळे म्हणती तुला आंबा

पाटलाच्या वाडीत जाता येईना

रक्षक आडवे होऊनी म्हणती जरा थांबा


तुला कधी विकत घेतो तर

कधी करतो तुझी चोरी

कधी कधी वाड्यामध्ये 

होते रे तुझ्यासाठी मारामारी


एवढा प्रिय का रे तू माझ्यासाठी

दही भात तुप रोटी 

अंडी मास कोंबडा आणी बकऱ्याची बोटी

हे फिके आहेत माझ्यासाठी


हर उन्हाळ्यात तु येतोस 

मन प्रसन्न करुन जातोस 

ते दिवसं कधी येतील

जेव्हा तू मला बारा महिने भेटशील


कधी कोणत्या साली तू नाही आलास

तर मी दुकानाची भेट घेतो

पण त्या माझा मधी तेवढी मजा नाही रे

जो तू आमरस मधुन आम्हांस देतो


किती कौतुक करु रे तुझे 

कितीही केले तरी ते अपुरे

निसर्गाचा हा कसा रे नियम 

फक्त उन्हाळ्यातच वाहतात तुझे वारे


Rate this content
Log in