लाडका बाप्पा
लाडका बाप्पा
1 min
336
प्रारंभी वंदू
अधिपती तू
तूच गणेशा
विघ्नहर्ता तू ||१||
विद्येचा दाता
मंगलमूर्ती
संकट हारी
जगात किर्ती ||२||
उंदीर मामा
वाहन असे
वरद हस्त
पाठीशी असे ||३||
मोदक तुम्हा
प्रिय फारच
दुर्वा जास्वंद
आवडीचेच ||४||
लाडका बाप्पा
तिन्ही लोकात
हाक देताच
येतो धावत ||५||