कवितेच्या जगात*
कवितेच्या जगात*
1 min
489
कविता म्हणे मला
मी नसते कोणा *एकाची,*
सारेच आहे माझे
बंधने नसावी *कोणाची.*
काव्यात रमताना
भावना मनाची *असते,*
कागदावरी माझी
फक्त प्रतिमा *उतरते.*
कधी मुक्तछंदात
गझल, लावणी, *चारोळी,*
या नाना प्रकारात
रचतात काव्यांच्या *ओळी.*
मनातील भावना
हळूच ओठावर *येते,*
लेखणीच्या आधारे
रचना सुंदर *दिसते.*
यमक साधताना
कवितेत गोडवा *येतो,*
रसिकांनी वाचता
कवितेला आनंद *होतो.*