Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

कवितेची कविता

कवितेची कविता

1 min
256


अहो काय सांगू

कविता होते कशी ?

उठते एक वावटळ.....

मनी खूप खळबळ !


आवरत नाही मग

भावनांचा वेग आणि

झऱ्यासारखी

कविता फुटते खळखळ !


सुख दु:ख सारेकाही

सोबत घेऊन येते

खऱ्या खुऱ्या भावनांची

नदी होऊन येते !


त्या निर्मळ जळी

जग न्हाऊन निघते !

वाहवा वाहवा ऐकून

ती"भाव" खाऊन घेते !


तुमच्या आमच्या

मनातील झरा 

कविता होऊन

बाहेर येतो खरा !


प्रत्येकास वाटे

हीतर माझीच कथा

सहजीवन करी सोपे

कविता सदा !


Rate this content
Log in