STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Children Stories

3  

Meenakshi Kilawat

Children Stories

कविता

कविता

1 min
154

 आठवण बालपणीची



मनसोक्त खूप हसायचे

विद्यार्जन करायचे

सवंगडीसवे भांडायचे

काळजातही वसायचे....

पुन्हा मिळेल का असे

निरागस साधे बालपण

तो आईचा ममतेचा पदर

ते निखळ समृद्ध जीवन......

बालपणीचा अतुलित आंनद

विसरता नाही विसरत

हरवले आता माझे बालपण

पुन्हा बालपण देगा देवा मस्त।।

जीवनातल्या मधुर स्मृती

साठवून गोड आठवणी

गेला तो काळ गेला आता

वांरवांर येत असे ग्लानी।।

खेळणे मस्त खाणे मस्त

चिंतारहित जीवन जगणे

नदीवर जावून छान पोहणे

कसे विसरु ते रडणे-पडणे।।

आठवण माझी बालपणीची 

आजही आहे ह्रदयात

लपून छपून नदीवर जायचे

पोहायचो फवारे उडवत ।।


मीनाक्षी किलावत

8888029763



साहित्याला गुण द्या
लॉग इन