STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

कविता

कविता

1 min
266

कवितेने दिले डोळे

कवितेने दिली सृष्टी

कवितेनेच जगायला

दिली नवी नवी दृष्टी


कविता म्हणजे जान

कवींच्या आत्म्याची तान

शब्दातून जे ओतले

ती कविता आहे प्राण


रवी ताकात फिरावी

यावे काठावर लोणी

हृदयातल्या शब्दांतून

येती ओठावर गाणी


कविता नैसर्गिक देणं

कविता शब्दाचे लेणं

कवींच्या समृद्ध भावना

मिळे कवितेतून पाहणं



साहित्याला गुण द्या
लॉग इन