कवाड
कवाड
1 min
11.6K
सोनेरी किरणाची रम्य पहाट,
मंजुळ पक्षांची ती किलबिलाट.
आठवणीचा दरवळला निशिगंध,
भारतमातेच्या ओंजळी फुलांचा सुगंध.
गुलामगिरीची तोडून बंधने,
आत्मबलीदानाने सोडवली ही माय.
राज्य केले, प्रत्येक ह्दयाच्या कवाडात,
जातीभेदाची नव्हती खोटी ती साय.
अन्याय, भष्ट्राचारांचा संपवून काळ,
चांगल्या दिवसाचा घेऊन सुवर्णकाळ .
कोरोनाने केले देवाचे बंद ते कवाड,
पळे, ऐकून बलशाही लेकरांची दहाड.
ज्याची करणी, त्याचाच करे विनाश,
ठेवू, सर्वांच्या भल्याची विजयी सुबुद्धी.
मायबाप, देव, गुरू चरणी चितशुद्धी,
सार्वभौमाचे कवाड्यातून आली समृध्दी.
