कुणीतरी असाव
कुणीतरी असाव
1 min
270
कुणीतरी असावं
हळव मन ओळखणार
दाटले अश्रू डोळ्यांमधी
शब्दांचे भाव जाणणार
कुणीतरी असावं
मायेन बिलगणार
सभोवती कोणीही असो
मनाचे भाव ओळखणार
कुणीतरी असावं
आपुलकी जपणार
कितीही संकटे आली
तरी साथ न सोडणार
कुणीतरी असावं
हक्काने रागावणार
राग कितीही असला
तरी परत जवळ घेणार
