STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

कुलूपबंद

कुलूपबंद

1 min
11.6K

दिवस आले हे जगायचे,

भारतीय संस्कृतीच जपायचे.

नमस्कार दोन्ही हाताने करायचे,

संसर्ग, विषाणूजन्य टाळायचे.


चिकन, बर्गरही सोडायचे,

उगा पाश्र्चिमात शैलीत मिरवायचे.

शाकाहारी जेवणाची महत्ती,

कळली तरी वळत नव्हती मस्ती.


स्वरक्षण गुढी उभारू बचावाची,

साऱ्यांच्या सुखा, जमावबंदी पाळायची.

सर्मपणात अहंम भावना विसरायची,

एकात्मतेने कोरोनास पळवायची.


कुलूपबंद गावचे घर आठवायचे,

वाटे निसर्गाच्या सानिध्यात राहायचे.

हव्यास सोडून वनसंवर्धन करायचे,

स्वच्छ देश, नागरिक घडवायचे.


Rate this content
Log in