STORYMIRROR

गीता केदारे

Others

3  

गीता केदारे

Others

.. कष्टाचे मोल...

.. कष्टाचे मोल...

1 min
741

.... कष्टाचे मोल.... 


स्वतः कष्ट केल्याविना

मोल कष्टाचे कळेना 

परिश्रम केल्याविना

कष्टफळ रे रुचेना....


आकाशात काय बघू 

भाकरीत चंद्र दिसे 

वास लक्ष्मीचा असतो 

राबणारे हात जिथे.... 


एवढीशी मुंगी करी 

साखरेचा कण गोळा 

वसतसे परिश्रमी 

सदाशिव देव भोळा... 


भाग्य लिही सटवाई 

हातावर भाग्यरेषा

यत्न तोचि देव जाणा 

नको आमंत्रण क्लेषा.... 


अरे संसार चाले हा 

दोन जीवांच्या चाकाने

चक्र चालू अविरत 

चिरकाल प्रपंचाने .... 



Rate this content
Log in