क्षण
क्षण
1 min
361
येतो क्षण जातो क्षण
आपला कुठे राहतो क्षण..
तरीही का मग वेडा जीव
तळमळतो इथे प्रत्येक क्षण..!!
क्षणात मजेत हसवतो क्षण
क्षणात सजेत रडवतो क्षण..
क्षणा क्षणाच्या क्षणिक खेळात
क्षणात गुपचुप हरवतो क्षण..!!
आज तुझा तर उद्या माझा
वारा जैसा वाहतो क्षण..
एकनिष्ठ ना कधी राहिला
ऋतू जैसा बदलतो क्षण..!!
क्षणाचा नाही भरवसा इथे
तरीही भरत नाही हे मन..
क्षणिक क्षणाच्या मोहापायी
वाया जाती निर्भेळ क्षण..!!
