STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational Others

कशाला उद्याची बात

कशाला उद्याची बात

1 min
310

आनंदाने मस्त जगायचं

कशाला उद्याची बात

रडगाणे ते नकोच आता

सरून गेली ती रात.....!!


कोरोनाला हरविण्यासाठी

बसा ना घराच्या आत

आजच लस घेऊन टाका

कशाला उद्याची बात......!!


जीवघेणा निष्काळजीपणा

संपून जाईल माणसांत

नियमांचे पालन करा

कशाला उद्याची बात....!!


लाख मोलाचे आरोग्य

कोरोनावर करूया मात

मास्क वापरा सा-यांनी

कशाला उद्याची बात....!!


संकटात धावून जावे

कशाला विचारता जात

माणुसकी थोडी ठेवा अंगी

कशाला उद्याची बात......!!


संसर्गजन्य रोगांपासून

नेहमीच होतोय रे घात

स्मशानात भयानक दृश्य

कशाला उद्याची बात.....!!


आजचा दिवस आनंदाचा

एकमेकांना द्यायची साथ

कोण जाणे भरवसा उद्याचा

कशाला उद्याची बात.....!!


बालकांना लावा सवयी

दोन वेळा घासायचे दात

संस्कार चांगले करा आज

कशाला उद्याची बात.....!!


व्यायाम करा भरपूर रोज

जर पहायची असेल नात

चांगल्या सवयी लावून घ्या ना

कशाला उद्याची बात.....!!


चिंता, दुःख सोडून दे रे

निघून जाईल वैरी रात

आजचा दिवस मस्त रहा

कशाला उद्याची बात.....!!


मुलगा मुलगी एकसमान

मग कशाला पाहिजे दिव्यास वात

सोड सारी मोहमाया माणसा

कशाला उद्याची बात.....!!


जाता जाता सत्कर्म करावे

शेवटी जाणार खाली हात

आजचा दिवस मस्त जगायचं

कशाला उद्याची बात.....!!


कर्तव्याचे माप मोठे आहे

मिनू सांगते ठेव तू ध्यानात

आजचा दिवस मस्त जगायचं

कशाला उद्याची बात......!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳झाडे लावा झाडे जगवा🌳🌳🌳🌳


Rate this content
Log in