STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

करूया स्वागत सृष्टीच्या सृजनाच

करूया स्वागत सृष्टीच्या सृजनाच

1 min
467

वसंत ऋतुचे होता आगमन 

भिरभिरती फुलांवरी फुलपाखरं!

फळांफुलांतील मधुकण प्राशण्या

मधमाश्या आनंदे सदा तत्पर!

आम्रवृक्षावर बघूनी मोहर 

तान छेडतो कोकीळ सुस्वर!

कमळातील घेत असता परीमल 

होई का कैद बेधूंद तो भ्रमर?!

नभी दाटूनी घननीळ येता 

पिसारा फुलवून नाचे मयुर!

हूंगण्या सुगंध ओल्या मातीचा

खोंड घेतसे धाव का सर्वदूर!

पावसाचा पिण्या थेंब पहिला

असे का चातक सदा आतुर?!

नसतांना मधुर स्वर रे तुझा

धरतोस कारे बेडका तू सूर!

भिजता धरीञी पर्ण डोकावती

अंकुरातूनी करीत नमस्कार!

अभिवादन करावे ते स्रुजनत्वाचे 

वृक्ष प्राणी पक्ष्यांतही असे संस्कार!

वर्षा ऋतुचे जणू करण्या स्वागता

घेवूनी शंख पाठीवर उभी गोगलगाय!

सोहळा सृष्टीचा संपन्न होता सर्वांसाठी

मानवा का जाई पळूनी रे काढीत पाय!


Rate this content
Log in