STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

4  

Mala Malsamindr

Others

कर्तव्याचे ओझी

कर्तव्याचे ओझी

1 min
24.1K

  दुःख तुला स्वतःलाच भोगावेसे का वाटते?

   जीवनाच्या वाटेवरती चालतांना 

   आई मीच तुला बघितले जवळून 

   आणि चोरूनही बघितले तुला वळून 

  तुला मेणबत्ती सारखे जळावे का वाटते?

   सर्वांनाच प्रकाश देण्यास 

    मेनबत्ती सारखी तेवत राहण्यास 

   नेहमीच दुसऱ्याला सुख देण्यास 

 तुला नेहमीच का मनापासून आवडते ?

   तुझ्या दुःखाची चाहूलही न देता 

   तोंडातून उफ ही न काढता

   दुःख गिळत...गिळत सुखच मानत 

  हास्य तुला सर्वांनाच का द्यावेसे वाटते ?

   आत्ताच मी जेवले सांगत

   सर्वांना पोटभर जेऊ घालत 

   पाणी ढसाढसा पिऊन घेत

 तुला उपाशीच का झोपी जावेसे वाटते? 

   तापत्या उन्हात काम करत करत

   रखरखत्या थंडीत मोळी आणत 

   चुली जवळ काम करत करत

   तुझी कातडी झाली भाजल्यागत 

 तुला ब्र ही का नाही काढावासा वाटत?

   अपरंपार शक्ती होती तुझ्यात 

   सुखी होती तू आमच्या सुखात

   या त्यागालाच म्हणतात का माय

  ती थकली नाही कधी राहिली सदा पेलत 

   कर्तव्याची ओझी.


Rate this content
Log in