STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

कोरोनाचा नायनाट..

कोरोनाचा नायनाट..

1 min
477

स्वच्छतेचं महत्त्व जाणा, चला करा सुरुवात

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट...


ओसाड हे रस्ते सारेच कोणीच कुत्र नाही

हॉटेल, दुकान, मॉल,थेयटर बंद सारं काही,

शाळा, कॉलेज, ट्युशन बंद, सारेच बंद घरात..

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट...


शिंकताना, खोकताना सारे घ्यावी खबरदारी

जागरुकता ठेवा नको भरोसा आफवावरी,

घराबाहेर जाणे टाळा त्या गर्दीत दाट...

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट..


पोलीस डॉक्टर प्रशासनाला करावी मदत

प्रवासही टाळावा साऱ्यांनी पहा जनहित,

दिसता लक्षणं कोरोनाचे व्हावे लवकर आडमिट..

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट...


शिंका, सर्दी, ताप, खोकला होता घशाचा त्रास

फुफ्फुसे, श्र्वसन विकार होता भेटा डॉक्टरास,

जगावर च हे आलंय बरं लई मोठं संकट..

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट...


साबण, डेटॉल वापरा नेहमी हात स्वच्छ धुवा

तोंडाला मास्क रुमाल वापरायला च हवा,

इटली, जर्मनी, चीन अमेरिका झाले हाल वाईट..

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट..


लई अनमोल जीव घ्या काळजी या जीवाची

राहा घरात सुरक्षित नको लागण कोरोनाची,

साऱ्या जगाला घेरलं य हे कोरोना महा संकट..

या कोरोनाचा आपण सारे करू या नायनाट..


Rate this content
Log in