कोरोना
कोरोना
फिनिक्सापरी घेऊ दिव्यप्रकाशी झेप,
पुढेच जाऊ छेदून काळचक्रांचा कोप.
प्रगल्भ आत्मविश्वासाने पताके लावू,
देशाचा अभिमान मनामनात रूजवू.
कोपला निसर्ग, की मृत्युचा हाहाकार,
माणसाचा घमंड आला थाऱ्यावर.
उत्तम मुल्यसंस्काराचे दीप जगी लावू,
शुद्ध पवित्र,चैतन्य वातावरण खुलवू.
जीवनात पेटवू सदवर्तनाचा प्रकाश,
जळून दे साऱ्या दुर्गुणांचा क्लेश .
स्वच्छ निर्मळ करुन राहणीमान,
निरोगी होईल आपला देशमहान.
नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास थांबवून,
उज्ज्वल भविष्याचे करू रक्षण.
आत्मक्लेश दूर करे जप,तप,सिद्धी,
जागृत करू सदसद्विवेकबुद्धी.
समभावनेचा दिव्यप्रकाश जगी नांदवू,
एकात्मतेने कोरोनास पळवून लावू.
आनंद फुलवू, सृष्टीच्या रक्षणा उभे राहू
देश यशाची सीमा अधोरेखित पाहू.
दिव्यप्रकाश कवडसा सेवा भावनेचा,
ध्यान धारणेतून मार्ग सुखशांतीचा.
माणूसकीचा असू दे माधूर्य मुखात,
अंत तिमिराचा चमके ज्ञान ज्योत.
