STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

कोरोना...चला सतर्क होऊया...

कोरोना...चला सतर्क होऊया...

1 min
425

चायना देशाचा हा आलाय परदेशी रोगी पाहुणा 

मनात घर त्याचे नि जगी चर्चेत नावाचा कोरोना... 

आपल्याच स्वार्थापायी केलीये निसर्गाची वानवा 

आता भीतीपोटी चिंताग्रस्तांना वेदना काही सोसवेना...


जीवघेण्या आजारांचा अमर्याद वाढतोय प्रादुर्भाव 

चला असो कोणताही विषाणू मेव्हणा काळजी घेऊया... 

अफवा नि फॉर्वर्डेड संदेशांवर करून कानाडोळा

चला निरोगी आरोग्याविषयी सतर्क आपण होऊया...


गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळून लुटू कुटुंबासोबत मौज 

संसर्ग रोखण्यास सॅनिटायझर नि मास्कचा करू वापर... 

अन्नसुरक्षेची खबरदारी घेऊन होऊ सज्ज लढायला 

अंधश्रद्धेपायी संस्कृतीवर उगाच कशाला हवंय खापर...


हा महामारीचा नाही तर ओरबाडलेल्या निसर्गाचा कोप 

सौहार्दाने जपून एकमेकां पीडितांचा मानसिक आधार... 

न घाबरता करून तपासण्या उपचाराची धरू मनी कास 

लवकरच रोगमुक्त देशाचे करू मनस्वी स्वप्न साकार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन